। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड बाजारच्या अध्यक्षपदी नृपाल पाटील यांची अध्यक्षपदी, तर प्रमोद घासे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सहकारी संस्था अलिबागचे सहाय्यक निबंधक मिलिंद पाटील यांनी ही निवड सोमवारी जाहीर केली. पंचवार्षिक ही निवड झाली असून, शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक मिलिंद पाटील यांनी काम पाहिले. अध्यक्षपदासाठी नृपाल जयंत पाटील यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी प्रमोद घासे यांनी नामनिर्देशन अर्ज भरले होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येक एक-एक अर्ज आला होता. त्यामुळे छाननीत दोन्ही अर्ज पात्र ठरवून नृपाल पाटील यांची अध्यक्षपदी, तर प्रमोद घासे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे मिलिंद पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी रायगड बाजारचे संचालक चित्रलेखा पाटील, अॅड. विजय पेढवी, अॅड. किशोर हजारे, संजय पाटील, प्रकाश म्हात्रे, सतीश वारगे, मधुकर ढेबे, भगवान मालपाणी, शीतल म्हात्रे, हर्षदा मयेकर, प्रकाश खडपे आदींबरोबरच सचिव दिलीप पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमळाकर वाघमोडे, मारुती सुरवसे उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष नृपाल पाटील, उपाध्यक्ष प्रमोद घासे तसेच सर्व संचालकांचे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.