53 रक्तदात्यांनी केले रक्तदान

| खांब | वार्ताहर |

78 व्या भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज, सी.एस.आर. विभाग प्रमुख माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव विकास प्रकल्प अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत तळवली तर्फे अष्टमी या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात एकूण 53 रक्तदात्यांनी रक्तदान करुन जनसेवा जोपासली.

कार्यक्रमादरम्यान माणसाने आयुष्यामध्ये जनसेवेसाठी काही द्यायच असेल तर मानव रक्तच देऊ शकतो आणि आज तळवली रहिवाशांकडून हे आद्यकर्तव्य पार पाडले आहे.असे मत सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजचे साईट हेड विवेक गर्ग यांनी व्यक्त केले. सहभागी रक्तदात्यांचे व सुदर्शन सी.एस.आर. फाऊंडेशन अंतर्गत केलेल्या सामाजिक कामाचे सरपंच रवींद्र मरवडे यांनी वर्णन केले. कार्यक्रमादरम्यान सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजचे सिक्युरिटी हेड गणेश बांभुरकर, उपसरपंच संदीप महाडिक, सर्व ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन क्षेत्र अधिकारी अमर चांदणे यांनी केले व आभार प्रदर्शन रवि दिघे यांनी केले. या रक्तदान शिबिरास महेश डेरिया, संजय कचरे, दिशांत ढाणे व विनय देशमुख आणि डॉ. गोसावी व टिम यांचे सहकार्य लाभले.

Exit mobile version