ऑनलाइन फसवणूक

पनवेल । वार्ताहर ।

मोबाईलवर लिंक पाठवून ऑनलाइन रिसीव्ह नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे 56 हजारांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वामी नित्यानंद रोड, पनवेल येथील विनोद गोविंद नेमण यांचा पनवेल बस स्टँडच्या पाठीमागे लक्ष्मी डिस्ट्रीब्यूटर या नावाने औषधाचा व्यवसाय आहे. त्यांनी काही औषधे युएसला पाठवले होते. त्यासाठी मोबाईलमधून गुगलवर जाऊन ऑनलाईन पनवेल येथील फेडेक्स कुरिअरचा नंबर शोधला. त्या नंबरवर कॉल केला असता ऑफिसच्या रिनयूएशनचे काम सुरू असून ऑफिस बंद असल्याचे सांगण्यात आले. कुरिअर करण्याकरता एक लिंक पाठवून त्याने ऑनलाइन रिसिव्ह नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले व पाच रुपये फोन पे किंवा गुगल पे ने पाठवण्यास सांगितले. फोन पे वरून समोरील इसमास विनोद यांनी पाच रुपये पाठवले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तीस हजार व पाच मिनिटानंतर सव्वीस हजार असे एकूण 56 हजार डेबिट झाल्याचा मेसेज विनोद यांना आला. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या बँकेत जाऊन अकाउंट डिजिलॉक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी सायबर सेल, नवी मुंबई या ठिकाणी माहिती देऊन पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Exit mobile version