। रोहा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील २४० पैकी १९१ सार्वत्रिक ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू झाले आहे. २४० सरपंचपदासाठी ५३१ उमेदवार तर १ हजार ९४० सदस्यपदासाठी ३ हजार २३८ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.
रोहा तालुक्यातील ५ ग्रामपंचायंतीच्या निवडणुकांसाठी आज मतदार होत आहे. रोहा तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात ६५.७२ टक्के मतदान झाले असून मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळ पासूनच मतदान केंद्रा बाहेर रांगा लावल्या आहेत