ओडिसामध्ये भीषण अपघातात, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

7 जण गंभीर जखमी

| ओडिसा | वृत्तसंस्था |

क्योंझर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग-20 वरती झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेल्या व्हॅनने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. शुक्रवारी पहाटे अपघात झाला. सर्व मृत गंजम येथील दिगापहांडी येथील रहिवासी होते. पोदामारी गावातील 20 जण व्हॅनमधून जिल्ह्यातील माँ तारिणी मंदिराकडे जात असताना हा अपघात झाला. यातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकाचा घाटगाव रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरुवातीला जखमींना घाटगाव रुग्णालयात नेण्यात आले, परंतु नंतर पुढील उपचारांसाठी त्यांना कटकच्या एससीबी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवण्यात आले.

Exit mobile version