| कर्जत | वार्ताहर |
कर्जतमधील ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चमध्ये गेल्या काही दशकांपासून प्रत्येक वर्षी दि.13 ऑक्टोबर किंवा त्या नंतर येणाऱ्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. यंदा 88 वी फातिमा मातेची तीर्थयात्रा रविवारी दि.15 रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी अनेक भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. या तीर्थयात्रेच्या वेळी कर्जत रेल्वेस्थानका नजीकचा परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी फातिमा मातेच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. चर्चचे प्रमुख लुईस कजार यांच्या उपस्थितीत बिशप ऑलविन डिसिल्व्हा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ऑलवीन मिस्किटा, फ्रान्सिस बाप्टिस, डेनिस डिसोझा, सिल्व्हर फ्रान्सिस, पॉल फ्रान्सिस, ॲड. सनी डिमेलो, विल्सन पानपाटील, विक्टर मास्करेन्स, नेल्सन फ्रांसिस, फ्रान्सिस जेनिफर, सविवो फ्रान्सिस, एडविन सुई, तमा आंची तसेच असंख्य ख्रिश्चन बांधव भगिनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.