अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 90 नवे रुग्ण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात बुधवारी 21 जुलै रोजी कोरोनाच्या 90 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, आज उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर 68 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात 18 हजार 004 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 509 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 16 हजार 668 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 827 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version