अलिबाग तालुक्यात कोरोनाचे 95 नवे रुग्ण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात मंगळवार, दि. 13 जुलै रोजी कोरोनाच्या 95 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, दिवसभरात 136 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात 17 हजार 451 संसर्गित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 15 हजार 789 रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर, उपचारादरम्यान 497 रुग्णांचा मृत्यू झाला. तर, सद्यःस्थितीत 1 हजार 165 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version