खरसई शाळेचा स्तुत्य उपक्रम
| कोर्लई | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील मॉडेल स्कूल ओळखल्या जाणाऱ्या रा.जि.प.आदर्श शाळा खरसई मराठी शाळेने एक राखी सैनिकांसाठी सीमेवरच्या भावासाठी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन शाळास्तरावर करण्यात आले.
यावेळी तालुक्यातील बनोटी गावचे हरी अंबाजी म्हात्रे यांचे सुपुत्र भारत हरी म्हात्रे (सेवा 11 वर्ष, पोस्टेड बंगाल) आणि कुमार विनायक हरी म्हात्रे (सेवा 9 वर्षे पोस्टेड पंजाब) या दोन्ही बंधूंची योगायोगाने उपस्थिती लाभली. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी आरती ओवाळून त्यांना राखी बांधली. त्यांनी विद्यार्थ्यांना देशाबद्दल व सैनिकी भरती, प्रशिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. या उपक्रमांतर्गत 500 राख्या तयार करून सीमेवरील सैनिकांसाठी पोस्टाद्वारे पाठविण्यात आल्या. या उपक्रमासाठी जयसिंग बेटकर, संदीप शेबांळे यांचे मार्गदर्शन लाभले. राम थोरात, मुख्याध्यापिका शारदा कोळसे यांनी राखीचे व सणाचे महत्त्व सांगितले. शाळा समिती अध्यक्ष व पदाधिकारी यांनी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.