| अलिबाग | प्रतिनिधी |
गोठ्यात बांधून ठेवलेल्या गायीची चोरी अज्ञात चोरट्याने केली. ही घटना 19 ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी नागोठणे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागोठणेमधील आझाद मोहल्ला येथील तक्रारदाराने त्याच्या राहत्या घराच्या मागील बाजूस गोठ्यामध्ये गाय बांधून ठेवली होती. अंधाराचा फायदा घेत चोरट्याने गायीची चोरी केली. ही बाब तक्रारदाराच्या लक्षात येण्यापूर्वी चोरट्याने तेथून पळ काढला. लाल रंगाची असलेली गाय साधारण साडेतीन वर्षांची आहे. तिची शिंगे बारीक असून, उंची चार फूट आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार म्हात्रे करीत आहेत.