| अलिबाग | प्रतिनिधी |
ज्येष्ठ नागरिक संस्था, अलिबागची त्रैमासिक सभा शुक्रवारी (दि.22) चेंढरे येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत हे होते. या सभासदांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.
या सभेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राऊत, उपाध्यक्ष चारुशिला कोरडे, सचिव यशवंत थळे, सहसचिव मेघना कुलकर्णी, खजिनदार दिलीपकुमार देवळेकर, महिला आघाडी प्रमुख ज्योती पाटील, ज्येष्ठ संचालक गजेंद्र दळी, आर.के. घरत, नंदू तळकर, मनोहर सुर्वे, पुरुषोत्तम साठे यांच्यासह शरद कोरडे, श्रीरंग घरत, भारती तरे, शुभांगी आंब्रे, विजया म्हात्रे, प्रभाकर दांडेकर, सखाराम पवार, पांडुरंग कांबळी, शिवशांती स्नेहालय वृद्धाश्रम व विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष डॉ. सुभाष म्हात्रे व साहित्यिक उमाजी केळुसकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी 2 ऑक्टोबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत ज्यांच्या वयाला 90 वर्षे, 80 वर्षे व 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा सभासदांचा सत्कार, तसेच या कालावधीत ज्यांचे वाढदिवस होते त्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभीष्टचिंतन करण्यात आले. अध्यक्ष प्रफुल्ल राऊत यांनी संस्थेच्या जमाखर्चाची आणि संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. यानंतर थळ येथील संजय कवळे यांच्या स्वरगुंजन वाद्यवृदांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सभेचे सूत्रसंचालन यशवंत थळे, शरद कोरडे, नंदू तळकर यांनी केले. सभा यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ संचालक, उद्योजक गजेंद्र दळी, विश्वजीत दळी व दळी कुटुंबाने परिश्रम घेतले. त्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या 350 हून अधिक ज्येष्ठ नागरिक सभासदांना भेटवस्तू देण्यात येऊन सभेचा समारोप झाला.







