तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश
| उरण | वार्ताहर |
उरण रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. ती मागणी मान्य करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात आले आहेत. यामुळे वाहनचालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उरण रेल्वे स्थानकाच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहन चालकांवर वेगाचे नियंत्रण राहणार नाही. यामुळे अपघात घडण्याची शक्यता होती. हे टाळण्यासाठी सदर मुख्य रस्त्यावर बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली होती. ती मागणी मान्य होत रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात आले आहेत. गतिरोधक बसविल्याने अपघात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे वाहनचालकांत समाधान व्यक्त केले जात आहे.