। उरण । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज नवीन शेवा येथे शिकणार्या दहावी व बारावी आर्टस् व सायन्सच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ बुधवारी (दि.14) संस्थेचे संस्थापक माजी आमदार मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी विध्यार्थ्याना मार्गदर्शन करताना भोईर म्हणाले की, दहावी व बारावी ही आपल्या जीवनाची पहिली व दुसरी पायरी आहे, येथे आपण यशस्वी झालात तर जीवनात पुढे यशस्वी होणर. म्हणुन थोडे दिवस टीव्ही, मोबाइल पासून दूर राहा व खुप अभ्यास करून गुणवंत होऊन आपले, गुरुजनांचे, आईवडिलांचे व आपल्या शाळेचे नाव मोठे करा, अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे उपाध्यक्ष गणेश म्हात्रे, सरपंच सोनल घरत, मुख्याध्यापक संतोष म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी के.एम. घरत, दिनेश घरत, शैलेश भोईर, रेखा म्हात्रे, अशोक दरणे, मयुरी घरत, प्रणिता भोईर, वैशाली म्हात्रे, निलेश घरत, सुरेश पाटील, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







