| नवीमुंबई | वृत्तसंस्था |
नवी मुंबईत एका विद्यार्थ्याची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तुर्भे येथील डॉ.सामंत विद्यालयात ही घटना घडली आहे. तुर्भे स्टोर येथील ४० ते ५० मुलांनी सदर विद्यार्थ्याला मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आदित्य भोसले असे मृत्य विद्यार्थ्याचे नाव आहे. ४० ते ५० जाणांनी आदित्या भोसलेला मारहाण केली तेव्हा त्याचा मित्र देवांग ठाकूर त्याला वाचवण्यासाठी पुढे धावून आला. मात्र समोर एवढ्या मोठ्या संख्येने मुलं होती की त्यांना रोखणे जमले नाही. यात दुसरा विद्यार्थी देवांग ठाकूर गंभीर जखमी झाला.






