। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे नागाव येथील युवा नेते अनिरुध्द मंगेश राणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची शोकसभा शनिवारी (दि.20) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ग्रुप ग्रामपंचायत नागावमधील सभागृहात होणार आहे.
यावेळी नागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, विद्यमान सरपंच हर्षदा मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, सदस्य निखील मयेकर यांच्यासह अनेक सदस्य, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
अनिरुध्द राणे हे नागाव ग्रामपंचायतीचे सदस्य होते. राजकियबरोबरच सामाजिक क्षेत्रात ते सक्रीय होते. शनिवारी (दि.13) सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. रविवारी त्यांच्या पार्थिवावर नागाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकिय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली. अनिरुध्द राणे यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली.