| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या विवा कॉलेजच्या कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना तशा आशयाचे नियुक्तीपत्र कॉलेजचे प्राचार्य विवेक ढेपे यांच्या हस्ते व उपप्राचार्य योगेश रानभरे, रुपेश जाधव, निलेश पालकर, जय पालकर, कॉलेजचे प्रा. प्रतीक नागरगोजे तसेच कॉलेजचे विद्यार्थी यांच्या उपस्थित देण्यात आले. सुवर्णा जाधव यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तररांतून अभिनंदन होत आहे.






