| खरोशी | वार्ताहर |
पेण शिक्षक पतपेढीची सभा शुक्रवारी (दि. 3) पार पडली. या सभेमध्ये कार्यलक्षी संचालक म्हणून आदिनाथ पाटील विषय शिक्षक रा.जि.प.शाळा-कणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पतपेढीचे विद्यमान चेअरमन रवी पाटील, व्हाईस चेअरमन मोरे सर, संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान मानद सचिव सोपान चांदे, संचालक विठोबा पाटील, मोहन भोईर, वसंत मोकल, तसेच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद पाटील, पतपेढीचे माजी चेअरमन अमरचंद पाटील, नंदकुमार थवई, किशोर पाटील, राजेंद्र पाटील, तालुका अध्यक्षा सावंत मॅडम, गजानन पाटील, प्रवीण पाटील उपस्थित होते.