| तळा | वार्ताहर |
तळा शहरातील भोईरवाडी येथे सोमवार, (दि.13) व मंगळवार, (दि.14) मे रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा 66 वा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी काकड आरती, अभिषेक, मंगल स्नान, कीर्तन, महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी विठ्ठल रखुमाईची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तर, मंगळवारी श्री सत्यनारायणाची महापूजा, व्याख्यान व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, ग्रामस्थांचे भजन, सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी ग्रामस्थ मंडळ,मुंबईकर मंडळ,महिला मंडळ व हौशी बाल मित्र मंडळ भोईरवाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.