| मुंबई | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईल अशी माहिती आहे. तर दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो.
बारावीचा निकाल येत्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.
दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम बोर्डाकडून तयार झाले आहे. उत्तर पत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले असून आता निकालाच तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.