चार जण गंभीर जखमी
। जालना । वृत्तसंस्था ।
समृद्धी महामार्गावर दोन कार एकमेकांना धडकून अपघात झाला आहे. यात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास कडवंची गावाजवळ हा अपघात झाला आहे. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारने जोरदार धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती कि, या अपघातामध्ये कारचा पूर्णपुणे चुराडा झाला आणि दोन्ही कार बॅरिकेट्स मोडून थेट खाली पडल्या. तसेच, या अपघातात सात जणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जालना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या सहा जणांची ओळख पटली आहे तर, एकाची ओळख अजून पटलेली नाही.