अलिबाग रोटरी,माणुसकी प्रतिष्ठान, कॉटेजेस असोतर्फे स्वच्छता मोहीम
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जागतिक पर्यटन दिनानिमित्त वरसोली- अलिबाग येथे साफसफाई आणि प्लास्टिक कचरा संकलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी 50 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला. या अभियानात रोटरॅक्ट क्लब अलिबाग तर्फे प्रतीक, तन्वी, गौरी, हर्षवर्धन, अलिबाग कृषी पर्यटन विकास संस्था अलिबाग- रायगडचे उपाध्यक्ष शेखर पडवळ, वरसोली कॉटेज वेल्फेअरचे अध्यक्ष मकरंद नाईक, माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान, तानाजी आगलावे व त्यांचे सदस्य, तसेच वरसोली ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ अलिबाग सिशोरने पुढाकार घेऊन नियोजन केलेल्या या कार्यक्रमास रोटरी क्लब अलिबाग सीशोरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र चांदोरकर, माजी अध्यक्ष डॉ. किरण नाबर, कोषागार निमिष परब, दिलीप भड, डॉ. राजश्री चांदोरकर, रूपाली शेठ, कुमार जोगळेकर उपस्थितीत होते.
सदर कार्यक्रमास जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जिल्हा परिषद रायगड जयवंत गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कौस्तुभ ताम्हणकर यांनी घनकचरा व्यवस्थापन याबद्दल तसेच कचरा निर्माण होऊ नये त्याचे पैशांमध्ये कसे रूपांतर करावे याबद्दल माहिती दिली.
अशा स्वरूपाच्या स्तुत्य उपक्रमाची सर्व स्तरावर नोंद व्हावी, सर्व माध्यमातून प्रचार करावा असे आव्हान रोटरी क्लब ऑफ अलिबाग चे अध्यक्ष रोटरीयन डॉ राजेंद्र चांदोरकर यांनी यावेळेस केले. तसेच अशा प्रकारचे कार्यक्रम अलिबाग परिसरात इतर ठिकाणीही आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.