| मुंबई | प्रतिनिधी |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेविरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. मागच्या आवठड्यात मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. याप्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटील या दोघांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. चेतन पाटीलकडे पुतळ्याच चबुतरा बांधण्याची जबाबदारी होती. त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जयदीप आपटे कल्याणला राहतो. आठ दिवस झाले, तरी अजून पोलीस त्याला शोधू शकलेले नाहीत. त्याचा थांगपत्ता लागत नाहीय. पोलीस त्याच्या कल्याणच्या घराबाहेर तळ ठोकून आहेत. अखेर सिंधुदुर्ग पोलिसांनी त्याच्याविरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पुतळा कोसळण्याच्या प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. जयदीप आपटे याला दीड ते अडीच फुटी पुतळे बनवण्याचा अनुभव होता, असं म्हटलं जातं.