। मुंबई । वार्ताहर ।
रिपब्लिकन गोल्डनमॅन म्हणून प्रसिद्ध असणारे रिपब्लिकन पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांचे शुक्रवारी (दि.27) वयाच्या 63 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि बहीण असा परिवार आहे. अंकुश गायकवाड यांच्या पार्थिवावर दुपारी 3 वाजता डोंबिवलीत स्मशानभूमीत बौध्द पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकुश गायकवाड यांच्या अंत्ययात्रेत रिपब्लिकन पक्षाचे गौतम सोनवणे, अण्णासाहेब रोकडे, दयाल बहादुरे, प्रल्हाद जाधव, नाना पवार, माणिक उघडे, किशोर मगरे, सिद्धार्थ रणपिसे, बाळकृष्ण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.