। अलिबाग । वार्ताहर ।
लायन्स क्लब पोयनाड ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवित आहे. याअंतर्गत क्लबचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदीप सिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (दि.7) राजिप प्राथमिक शाळा पोयनाडच्या विद्यार्थ्यांना शाळेचे दप्तर, गोष्टीचे पुस्तक, चित्रकला वही, रंगपेटी आदीचे वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे जिल्हा प्रांतपाल एन.आर. परमेश्वरन, द्वितीय उपप्रांतपाल प्रवीण सरनाईक, जीएसटी कोऑर्डिनेटर विजय गणात्रा, डिस्ट्रिक कोऑर्डिनेटर एसएन. मूर्ती, रिजन चेअरपर्सन विजय वनगे, झोन चेअरमन दिलीप गाटे, प्रदीप सिनकर, लायन्स क्लब पोयनाडचे अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष प्रगती सिनकर, सचिव सुनील काकडे, खजिनदार रत्नकांत सूर्यवंशी, अरविंद अग्रवाल, प्रमोद राऊत, संदीप पाटील, महेंद्र पाटील, नीलम माळी, सविता पाटील, मुख्याध्यापिका मनीषा टेमकर, तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.