। पनवेल । वार्ताहर ।
अबोली महिला रिक्षा संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेतर्फे रिक्षाचालक महिलांसाठी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणीचे आयोजन 29 ऑक्टोबर रोजी नील हॉस्पिटल सेक्टर 1 नवीन पनवेल येथे करण्यात आले आहे.
यासाठी रिक्षा चालकाचे वय 30 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी या ठिकाणी एचपीव्ही टेस्ट करून घ्यावी आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचा प्रतिबंधक करावा. ही टेस्ट करण्यासाठी 3 हजार रुपये खर्च असतो. परंतु काही काळासाठी निल हॉस्पिटल येथे ही टेस्ट मोफत उपलब्ध राहणार आहे.