बेपत्ता असलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट बुधवारी (दि. 18) बुडली होती. या घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. यात अनेक प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र या अपघातातील दोघे जण अद्यापही बेपत्ता होते. त्यापैकी हंसाराम भाटी (43) यांचा मृतदेह अखेर भाऊचा धक्क्याजवळ सापडल्याची माहिती मिळाली आहे. तर जोहान निस्सार पठाण (7) अद्यापही बेपत्ता असून शोधमोहीम आणि बचावकार्य सुरू आहे. त्यामुळे या घटनेतीत मृतांचा आकडा 14 वर पोहोचला आहे. मृतांमध्ये 8 पुरुष, 4 महिला आणि 2 बालकांचा समावेश आहे.