मुंबई | प्रतिनिधी |
दिवाळीच्या पाश्वर्र्भूमीवर विद्यार्थ्यांना शासनाने सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक अशा सर्व शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सणाची सुट्टी असेल.या कालावधीत शाळांकडून सुरू असलेले ऑनलाइन अध्यापनही बंद राहील,असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेले आहे. या कालावधीत शाळांमार्फत घेण्यात येणारे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने सुरु असलेले वर्ग बंद राहतील,असेही नमूद करण्यात आले आहे.