। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथील आदीवासीवाडीवरील 14 वर्षांची मुलगी काही कारणास्तव बाहेर गेली असता तिचे कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना घडली आहे. फिर्यादी रा.मुळगाव आदीवासीवाडी, ता.कर्जत यांची मुलगी वय-14 वर्षे ही दि.28 ऑक्टोबर रोजी घरातुन शेलु येथे फिर्यादीचा मेव्हणा याचेकडे जाते असे सांगुन पायी चालत खांडपे कडे निघाली होती ती अदयापपावेतो शेलु येथे पोहचली नाही म्हणुन फिर्यादी यांची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात इसमाने पिडीत मुलगी वय-14 वर्षे हीचे अज्ञानपनाचा फायदा घेवुन तीचे कोणत्यातरी अज्ञात कारणाकरीता अपनयन करुन पळवुन नेले आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सपोनि/श्री.आल्हाट हे करीत आहेत.