। अलिबाग । वार्ताहर ।
फेसबुकद्वारे आश्लील चॅटींग करून विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दि.16 नोव्हेंबर रोजी अलिबाग येथील शिवराज इंटरनेट सर्विस ऑॅफीसच्या ऑनलाइन फेसबुकव्दारे आरोपीत काशीनाथ ठाकुर नावाचे फेसबुक अकांउट धारकाने महिला फिर्यादी रा.शिवाजीनगर ,ता.अलिबाग यांचे फेसबुक अकांउटवर त्याचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने आश्लील चॅटींग करुन तसेच आश्लील चिञफित पाठवून त्याच्या मनात लज्जा उत्पन करुन त्याचा विनयभंग केला. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोनि/श्री.सणस हे करीत आहेत.