| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यात जिकडे-तिकडे वणवा लागत असल्यामुळे जंगलांसह गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर येत चालला आहे. जंगले ही आपली खरी संपत्ती मानली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष असतात. ही झाडे लागवडीपासून मोठी होईपर्यंत खूप कालावधी लोटला जातो. मात्र, वणव्यांच्या प्रकोपाने यावरत विपरीत परिणाम होत असतो. तसेच, येथील मोठ्या वृक्षांवर पक्ष्यांची घरटी असतात. त्यात त्यांची अंडी व पिल्ले देखील असतात. त्याचबरोबर जंगलात औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात असतात. मात्र, या वणव्यांमध्ये सुखलेले गवत, औषधी वनस्ती व पक्ष्यांची घरटी होरपळून निघत आहेत. हे वणवे विझविण्याचे कष्ट काही मोजकेच जण घेत असल्याचे पहावयास मिळत आहे. परिणामी वणवा ही आजची डोकेदुखी ठरत आहे. यावरती ठोस पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे निसर्गप्रेमींकडून बोलेले जात आहे.







