• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील समुद्रकिनारे मृत्यूचा सापळा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 15, 2026
in उरण, रायगड
0 0
0
उरणमधील समुद्रकिनारे मृत्यूचा सापळा
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरूच; प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा पर्दाफाश

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील समुद्रकिनारे हे आता पर्यटनस्थळ कमी आणि ‌‘मृत्यूचा सापळा’ अधिक बनत चालल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. सोमवारी (दि.13) सायंकाळी घडलेल्या घटनेत पाच पर्यटक समुद्राच्या भरतीत अडकून मृत्यूच्या दारात पोहोचले होते; मात्र, सागर सुरक्षा रक्षकांच्या प्रसांगवधानाने त्यांचे प्राण बचावले. या थरारक घटनेमुळे प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.

उरण तालुक्यातील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यासह नागाव किनाऱ्यावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. परंतु, या ठिकाणी सुरक्षेच्या नावाने मात्र शून्य व्यवस्था असल्याचे संतापजनक चित्र आहे. तसेच, धोकादायक भागांची कोणतीही सूचना नाही, इशारे देणारे फलक नाहीत, टेहाळणी चौक्या नाहीत. त्यामुळे ‌‘जा आणि जीव धोक्यात घाला’, असा मोकळा परवाना प्रशासनाने दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पिरवाडी परिसरात पीर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह मोठ्या प्रमाणात पर्यटक समुद्रात उतरत असतात. ओहोटीच्या वेळी पुढे गेलेले हेच पर्यटक भरती सुरू होताच चारही बाजूंनी पाण्यात अडकतात आणि आरडाओरडा करत जीव वाचवण्याची याचना करतात. अशा घटना वारंवार घडत असतानाही प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखी भूमिका घेतली आहे.

सोमवारी घडलेल्या घटनेत पाच पर्यटक भरतीच्या पाण्यात अडकले होते. माहिती मिळताच सागर सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न लावता धाव घेतली आणि अत्यंत धाडसाने सर्वांना सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली; मात्र, प्रत्येक वेळी नशिब साथ देईलच याची खात्री कोण देणार? असा सवाल स्थानिकांसह पर्यटकांमधून विचारला जात आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे, पिरवाडी ते नागाव समुद्रकिनाऱ्यावर एकही टेहाळणी चौकी नाही. सुरक्षा रक्षकांकडे आवश्यक साधनसामग्री नाही. तरीही ते स्वतःचा जीव धोक्यात घालून पर्यटकांचे प्राण वाचवत आहेत. प्रशासन मात्र वातानुकुलीत कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवत असल्याची तीव्र टीका स्थानिकांकडून होत आहे. तसेच, दरवर्षी अशा घटनांमध्ये वाढ होत असतानाही ग्रामपंचायत, तहसील प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि संबंधित विभागांनी एकत्र येऊन ठोस उपाययोजना केल्याचे दिसत नाही. हे निष्क्रियपणच उद्याच्या मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरणार, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे ‌‘आता तरी जागे व्हा’, असा संतप्त इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. तसेच, येथील किनाऱ्यांवर तात्काळ धोक्याचे फलक उभारणे, टेहाळणी चौक्या सुरू करणे आणि सागरी सुरक्षा रक्षकांना अत्याधुनिक साधनसामग्री देणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा, एखाद्या मोठ्या जीवितहानीनंतरच प्रशासनाला शहाणपण सुचणार का? असा संतप्त सवाल देखील नागरिकांमधून विचारला जात आहे.

घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग
पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर वारंवार घडणाऱ्या जीवघेण्या घटनांनंतर अखेर प्रशासनाला जाग आली असल्याचे चित्र समोर आले आहे. वर्षभरात अनेक वेळा पर्यटक आणि नागरिक भरतीच्या पाण्यात अडकून जीव धोक्यात घालण्याच्या घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत होती. मात्र, आता वाढत्या टीकेनंतर आणि सलग घटनांनंतर प्रशासनाने हालचाल करण्याचे संकेत दिले आहेत. उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी पिरवाडी किनाऱ्यावरील वाढत्या दुर्घटनांची दखल घेत, ग्रामपंचायतीमार्फत लवकरच योग्य ती खबरदारी घेत सुरक्षा फलक लावण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे. मात्र, हा निर्णय उशिराने घेतल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये आहे. तसेच, आता तरी प्रशासनाने फक्त घोषणा न करता प्रत्यक्षात तातडीने फलक उभारून, टेहाळणी व्यवस्था वाढवून आणि सुरक्षा उपाययोजना कडक कराव्यात. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाचीच राहील, असा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे.

पिरवाडी समुद्र किनारी वर्षभरात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेऊन या ठिकाणी सुरक्षा फलक लावण्यात येतील.

सर्जेराव पाटील,
गटविकास अधिकारी, उरण पंचायत समिती.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran beachuran news
Previous Post

अंदमान बेटाजवळील समुद्रात जहाज बुडालं

Next Post

सन्मान पाटील यांची न्यायाधीशपदी झेप

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने
sliderhome

स्मार्ट मीटरवरून पुन्हा वाद: संवादाअभावी ग्राहक-महावितरण आमनेसामने

July 14, 2026
जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!
sliderhome

जीवरक्षकांमुळे शाहरुख बचावला!

July 14, 2026
Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी
sliderhome

Palhe Bridge: पाल्हे पुलावरील लोखंडी बॅरिअर्स तोडून अवजड ट्रकची घुसखोरी

July 14, 2026
Next Post
सन्मान पाटील यांची न्यायाधीशपदी झेप

सन्मान पाटील यांची न्यायाधीशपदी झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?