I अलिबाग I विशेष प्रतिनिधी I
रेवदंडा येथील समुद्रात जेएसडब्ल्यू कंपनीची बार्ज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या भारतीय तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांना बार्जवरील 16 खलाशांना वाचवण्यात यश आले आहे.
रेवदंडा येथील समुद्रात बार्ज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बार्जवर 16 खलाशी होते. या खलाशांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवण्यात यश आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. अशी माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. ही बार्ज जेएसडब्ल्यू कंपनीची होती. सध्या भारतीय तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी 16 खलाशांना वाचवले आहे.
रेवदंडा खाडीमध्ये मुंबईवरून जेएसडब्ल्यू कंपनीकरिता येणारे मंगलम नावाचे कार्गो शिप एका बाजूला कलंडले होते. या जहाजावर 16 खलाशी होते व त्यांना रेस्क्यू करण्यासाठी मुरुड वरून कोस्ट गार्ड टीम आली होती. इंडियन कोस्ट गार्ड विभागाने हेलिकॉप्टरमधून बचाव कार्य करीत सर्व 16 खलाशांना सुखरूपपणे वाचविण्यात यश मिळविले आहे,अशी माहिती प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन लेपांडे यांनी दिली आहे. यापैकी 3 खलाशांना बोटीने वाचविण्यात आले होते तर उर्वरित 13 खलाशांना इंडियन कोस्ट गार्ड च्या हेलिकॉप्टरने वाचविण्यात आले.