| रायगड | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारीपदी (प्राथमिक) संजय नाईकडे यांनी शुक्रवारी (दि.17) पदभार स्वीकारला. शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांची पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर संजय नाईकडे यांची रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारीपदी (प्राथमिक) नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय नाईकडे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी फेब्रुवारी 2024मध्ये या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्याआधी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणे, शाळांमध्ये सेफ्टी ॲण्ड सिक्युरिटीश् कार्यशाळा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, मूल्यवर्धन कार्यक्रमासारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या मूल्यांची रुजवणूक करणे, अशा प्रकारचे विकसनशील उपक्रम राबविले आहेत. त्यांनी शुक्रवारी रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.







