| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
पर्यावरण रक्षणासाठी आणि कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्या वाहनांचे प्रदूषण प्रमाणपत्र त्वरित अद्ययावत ठेवावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल जयंत चव्हाण यांनी केले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमा अंतर्गत वाहनामधून उत्सर्जित होणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण व त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा थेट आणि गंभीर परिणाम मानवी आरोग्य व पर्यावरणावर होत असल्याने उच्च न्यायालयाने देखील या संदर्भात अत्यंत कडक निर्देश दिले आहेत. केंद्रीय मोटार वाहन नियम आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांची निर्धारीत कालावधीनंतर मान्यताप्राप्त संगणकीय प्रदूषण नियंत्रण केंद्रांमार्फत ऑनलाईन पद्धतीने प्रदूषण नियंत्रण चाचणी करून घेणे व त्याचे वैध प्रमाणपत्र सोबत बाळगणे कायदेशीररीत्या अनिवार्य आहे. सर्व वाहनमालक आणि चालकांनी जर वाहनाचे वायू प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत् अद्ययावत नसणाऱ्या तसेच रस्त्यांवर संशयास्पद वाटणाऱ्या प्रदूषक वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल या कार्यालयाचे वायूवेग पथकांद्वारे मोटार वाहन कायद्या अंतर्गत विविध कलमांखाली कडक दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.







