। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत-नेरळ राज्य मार्गावरील सावरगाव येथील दगडखाणीत मजुरी करणाऱ्या कामगाराच्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलीचा तसेच तिला पळवून नेणाऱ्या तरुणाचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावरगाव येथील सिंग यांच्या दगडखाणीत मध्य प्रदेश राज्यातील एक कुटुंब मजुरीचे काम करते. या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी शनिवारी (दि.22) सायंकाळी वाजण्याच्या सुरमारास आपल्या राहत्या घरी होती. त्याचवेळी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून कायदेशीर पालकत्वातून पळवून नेल्याची तक्रार तिच्या पालकांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.







