| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथे गोविंदाच्या निमित्ताने प्रथमच महिलांचा दहीहंडी फोडण्याचा थरार येथील ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला हा उपक्रम भाकरवड गावचे विघ्नेश रमेश पाटील यांच्या मित्रमंडळाच्या संकल्पनेतून साकारण्यात आली.
गेल्या आठ दिवस सायंकाळी सात वाजता पस्तीस हून अधिक महिला वर्ग सराव करीत आहे. आम्ही पाच थर लाऊन सलामी देणारच असा निर्धार या गोविंदा पथक महिला वर्गाने केलेला आहे. विघ्नेश पाटील मित्रमंडळास या बाबत विचारले असता त्यांनी आपल्या गावातील होतकरू महिला आहेत त्यांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळायला हवे आत्मीयता, जोश एकरूपता याच्यावर भर देऊन सर्वांनी एकत्र येऊन दहीहंडी फोडणाऱ्या महिला वर्गास रोख रक्कम पाच हजार, सन्मानचिन्ह ग्रामस्थ मंडळ भाकरवडचे अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आठशेहून अधिक ग्रामस्थ महिला तरुण मित्र मंडळी उपस्थित होते. तसेच गावातील नवरात्री महोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पडतो ग्रामस्थ, महिलावर्ग तरुण वर्ग एकत्र येऊन कोणाकडून देणगी न घेता अध्यक्ष शंकर पाटील यांच्या माध्यमातून दानशूर व्यक्तिमत्व यांच्या सहकार्यातून नऊ रात्री नऊ दिवस महाप्रसाद सर्व गावा साठी बनवला जातो ही परंपरा गेल्या तीस पस्तीस वर्षे गुण्या गोविंदाने अविरतपणे चालू आहे. गावात हरिपाठ, भजन नित्यनेमाने चालू आहे. भक्तिमय वातावरण आणि याला सुद्धा उत्तमरित्या प्रतिसाद मिळत आहे. गावातील कोणतेही सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात त्याचाच एक भाग म्हणून विघ्नेश पाटील मित्रमंडळाच्या या सुप्त उपक्रमाने संपूर्ण गाव आनंदाने हर्षित झालेला दिसत आहे.







