| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील लोहारे येथील माध्यमिक शाळा सुटल्यानंतर घरी चालत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत छेडछाड केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरूणाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.14) लोहारे माध्यमिक शाळेतून गावठाण विहीरीजवळून बौद्धवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून इयत्ता नववीतील 14 वर्षीय पिडीतेसह दोन शाळकरी मित्र आणि तिचा भाऊ घरी जात होते. त्यावेळी महाड तालुक्यातील चांढवे येथील झिशान अब्दुल बारी पानसारी (28) याने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिला वाटेत गाठून तिचा हात पकडून बाजुला असणाऱ्या गवतात जबरदस्तीने खेचून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याबाबत झिशान अब्दुल बारी पानसारी याच्याविरोधात पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. याप्रकरणी अधिक तपास महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे करत आहेत.






