माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायतीच्या उर्वरित 4 जागांसाठी येत्या 18 जानेवारीला निवडणूक होत असून यापूर्वी 21 डिसेंबरला 13 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून यावेळेस कोणत्याही परिस्थितीत माणगाव नगरपंचायतीत सत्तापालट निश्चित असून 17 पैकी 13 ते 14 जागांवर माणगाव विकास आघाडीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास माणगाव विकास आघाडीचे नेते अॅड.राजीव साबळे यांनी बोलताना व्यक्त केला.
माणगाव नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी माणगाव विकास आघाडीच्या उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज गणेश कॉम्प्लेक्स माणगाव येथून रॅलीने एकत्रित येत शक्तिप्रदर्शन करून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल इंगळे यांच्याकडे कोविड नियम पाळून दाखल करण्यात आले.यावेळी तहसील कार्यालय माणगाव येथे मार्गदर्शन करताना साबळे बोलत होते.
यावेळी ज्ञानदेव पवार,सिराज परदेशी,अजित तारळेकर,कपिल गायकवाड,सुनील पवार,नितीन दसवते,नितीन बामगुडे,राजू सुर्वे,शर्मिला सुर्वे,यशोधरा गोडबोले,नीलम बामुगडे,करुणा गायकवाड आदींसह विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.