726 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात मंगळवार दि. 1 फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या 264 नव्या रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 726 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 779 सक्रीय रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
मंगळवारी पनवेल महापालिका हद्दीत 126, पनवेल ग्रामीण 22, उरण 2, खालापूर 11, कर्जत 11, पेण 24, अलिबाग 38, मुरुड 6, माणगाव 3, रोहा 6, तळा 2, सुधागड 4, श्रीवर्धन 3, पोलादपूर 1 तर महाड 5 असे 264 रुग्ण आढळले. उपचारादरम्यान पनवेल मनपा 2, मुरुड 1 अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 12 हजार 051 झाली आहे. यापैकी 2 लाख 03 हजार 620 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 652 वर गेला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 779 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.