• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

‘स्मार्ट सिटी’चं काय झालं?

Varsha Mehata by Varsha Mehata
April 19, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोठमोठ्या घोषणा करायच्या आणि हजार कोटी, लाख कोटी असे आकडे लोकांच्या तोंडावर फेकायचे हे नरेंद्र मोदी सरकारचे वैशिष्ट्य राहिले आहे. स्मार्ट सिटीचा प्रकल्प हा मोदी यांच्या अशाच घोषणांपैकी एक. आता तो गुंडाळण्याची तयारी झाली आहे. एक एप्रिलच्या नंतर या प्रकल्पासाठी कोणतीही नवीन निविदा काढली जाऊ नये असे आदेश महाराष्ट्रातील शहरांच्या आयुक्तांना आले आहेत. देशातील शंभर शहरांना स्मार्ट बनवण्याचा चंग या योजनेत बांधण्यात आला होता. या संदर्भात बिझनेस स्टँडर्डमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतानुसार शंभरपैकी केवळ चौदा शहरांमध्ये नियोजित उद्दिष्टाच्या पन्नास टक्के कामे पूर्ण झाली आहेत. याचा अर्थ उरलेल्या 86 शहरांमधील स्थिती नाव घेण्याजोगी नाही. मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमधील 87 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उत्तर प्रदेशातील अन्य पाच शहरांमधील स्थितीदेखील बरी आहे. उत्तर प्रदेश भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे. त्यामुळे सरकारने सर्व लक्ष त्यावरच केंद्रीत केले असा त्याचा अर्थ. तरीही उत्तर प्रदेशातील पाच शहरे अशी आहेत की जिथे योजना जाहीर झाल्यापासूनच्या पाच वर्षांमध्ये जेमतेम तीस टक्के कामे होऊ शकली आहेत. महाराष्ट्रातील स्थितीही हीच आहे. पुणे हे महाराष्ट्रातले बोलक्या लोकांचे मोक्याचे शहर आहे. इथे जे घडेल त्याचा प्रचार सर्व महाराष्ट्रात होईल हे भाजपला बरोबर कळले आहे. त्यामुळे सध्या त्या पक्षाने पुण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर सोडून पुण्यातून निवडणूक लढवण्याचे कारणही हेच होते. त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पातील ऐंशी टक्के कामे तिथे पूर्ण झाली असल्याचा दावा केला जात आहे. पण नाशिक, ठाणे, कल्याण अशा इतर शहरांची स्थिती फारशी चांगली नाही. एकूण महाराष्ट्रात जेवढ्या रकमेची कामे व्हायची होती त्यातील केवळ वीस टक्केच झाली आहेत. पुन्हा ही सर्व निव्वळ आकडेवारी झाली. प्रत्यक्षात काय कामे झाली आहेत आणि त्यामुळे ते शहर किती स्मार्ट झाले आहे याची कल्पना या आकडेवारीवरून येत नाही. त्यासाठी प्रत्येक शहराचा लेखाजोखा स्वतंत्रपणे मांडावा लागेल. पुण्याचे उदाहरण घेतले, जिथे ऐंशी टक्के कामे पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे, तर तिथल्या वाहतूक व्यवस्थेत काहीही सुधारणा झालेली दिसत नाही. एसी बसेस वाढल्या आहेत. पण मुंबईत एकेकाळी ज्याप्रमाणे कोठूनही कोठेही जाण्यासाठी बेस्ट बसेस उपलब्ध असत तशी उपलब्धता अजूनही झालेली नाही. पुणे हे विद्यार्थ्यांचे शहर आहे. शहराच्या विविध भागांमधून विद्यापीठात जाण्यासाठी थेट बसेस असायला हव्यात. पण अशा बसेस आपल्याला दिसत नाहीत. 90 टक्के लोकांना दोन बसेस कराव्या लागतील. मध्यंतरी शहराच्या विविध भागांमध्ये अतिशय कमी भाड्यामध्ये सायकल उपलब्ध करून देण्याचीही एक योजना आखण्यात आली होती. पण तीही पूर्ण बारगळली. शिवाय, सायकलवाल्यांना सुरक्षित वाटेल अशी पुण्याची वाहतूकही राहिलेली नाही. इतर शहरांमध्येही हीच स्थिती आहे. मुंबईत एकदा तिकिट काढल्यावर रेल्वे, बस अशा कोणत्याही वाहनातून प्रवास करण्याची सोय होणार होती. ती आजतागायत होऊ शकलेली नाही. मुळात आपली सर्वच शहरे अत्यंत बकालरीत्या वाढली आहेत. त्यांना शिस्त लावणे हे अतिशय अवघड काम आहे. त्यासाठी खूप लांबवरचा व ठोस विचार करायला हवा. अन्यथा, बागेमध्ये थोड्या नव्या पद्धतीच्या घसरगुंड्या बसवणे किंवा गरज नसताना मेट्रोे रेल्वे सुरू करणे असले प्रकार घडतात. पुण्याचा स्वारगेटजवळचा उड्डाणपूल चुकीचा बांधला म्हणून पाडायची वेळ आली. स्मार्ट सिटीजमध्ये खरं तर लोकांचं आयुष्यात सुविहित होईल अशा कल्पक योजना राबवल्या जायला हव्यात. पण अनेकदा स्मार्ट म्हणजे भपकेबाज आणि चकचकीत योजना असा सरकारचा व प्रशासनाचा समज झालेला दिसतो. त्यामुळे ही सर्व शहरे दिवसेंदिवस राहायला त्रासदायक आणि खर्चिक होऊ लागली आहेत. यांच्या पिण्याच्या पाण्याचा, कचर्‍याच्या विल्हेवाटीचा, गलिच्छ वस्त्यांचा, हवेच्या प्रदूषणाचा असे कोणतेच प्रश्‍न नीटपणे सोडवले गेलेले नाहीत. तसे निदान एक शहर आपण निर्माण करू शकलो असतो तर बरे झाले असते.  

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

आरोग्य कर्मचार्‍यांना दिलासा

Next Post

मोदींच्या काळात विकलेले उद्योग!

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना
alibag

रायगड जिल्ह्याचा ‌‘एनसीसी मॅन‌’ हरपला; शेकाप नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या भावना

June 6, 2026
अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
Next Post
मोदींच्या काळात विकलेले उद्योग!

मोदींच्या काळात विकलेले उद्योग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?