। खरोशी । वार्ताहर ।
मानसी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 पेण तालुक्यातील खरोशी येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पांडुरंग घरत यांना नुकताच प्रदान करण्यात आला. यावेळी औरंगाबादचे महापौर नंदकिशोर घोडेले, किक बॉक्सिंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सत्यनारायण कुबेर, ज्येष्ठ समाजसेवक रमेश मुळे, साहित्यिक प्रा. ऋषिकेश कांबळे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आशा पाटील, सचिव सुलक्षणा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाल, श्रीफळ, मानपत्र, प्रशस्तीपत्र देऊन महेश घरत यांना गौरविण्यात आले. पेण तालुक्यातील खरोशी व परिसरात गेली अनेक वर्षे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, कोरोना काळात जपलेली सामाजिक बांधिलकी त्याचबरोबर क्रीडा सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात सहभाग घेऊन गावच्या सर्वांगिण विकासाबरोबर परिसरातील शाळांमधील विद्यार्थी शिकले पाहिजे याच हेतूने कार्य करत राहिले आणि खर्या अर्थाने्र राज्यामध्ये नावलौकिक झाला. त्यांनी केलेले सेवाभावी व सामाजिक क्षेत्रात केलेले लोकोपयोगी कार्य यात सतत सहभाग घेऊन समाजजागृती केल्याने महेश घरत यांचा सत्कार करण्यात आला.