। जम्मू-काश्मीर । वृत्तसंस्था ।
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे सोमवारी सकाळी 8 वाजता भीषण अपघात घडला. यात प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस दरीत कोसळली असून या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलांचादेखील समावेश आहे.
ही बस कुल्लूहून सेंजकडे जात होती. या बसमध्ये शाळकरी मुले प्रवास करत होती. बसमध्ये एकूण 45 प्रवासी होते. जखमींना बाहेर काढण्याचे काम तातडीने सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता जिल्हा आयुक्तांनी व्यक्त केली आहे.
हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेला बस अपघात हृदय पिळवटून टाकणारा आहे. या दुःखाच्या काळात मृतांच्या कुटुंबीयांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झाले आहेत ते लवकर बरे होतील.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान