। उरण । वार्ताहर ।
पावसामुळे उरण, पनवेल, नवघर पूल, फुंडे ते जेएनपीटी तसेच उरण शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. या मार्गावरील वाहनांना रस्त्यावरील पाण्याचा अंदाज घेत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे गेले काही दिवस उरण -पनवेल मार्गावरील वाहतूकही मंदावली होती.
सोमवारी रात्रीपासून संततधार व वादळी वार्यांसह जोरदार पाऊस सुरू झाला.त्यामुळे जेएनपीटीच्या चौथ्या बंदराला जोडणार्या न्हावा।शेवा पोलीस ठाण्याच्या उड्डाणपुलाखाली काही प्रमाणात पाणी साचले होते. त्याचप्रमाणे जेएनपीटी कामगार वसाहत ते फुंडे दरम्यानच्या मार्गावरही पाणी साचून एका बाजूने दुसर्या बाजूला वाहत होते. उरण पनवेल मार्गावरील बोकडविरा गाव, वायू विद्युत प्रकल्प, कामगार वसाहत, सिडको कार्यालय, वीर वाजेकर महाविद्यालय तसेच नवघर फाट्याजवळील रस्त्यावर पाणी भरले होते. या पावसामुळे उरण शहरातीलही नागरिकांची वर्दळ कमी झाली होती.