। नेरळ । प्रतिनिधी ।
भजन भूषण टीव्ही स्टार भजनीबुवा गजानन पाटील यांचे सुपुत्र आणि भजनभूषण प्रसादबुवा पाटील यांची गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजन त्यांच्या शिष्यांकडून करण्यात आले. हा कार्यक्रम कर्जत शहरातील डेक्कन जिमखाना येथील श्री दत्त मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पनवेल येथील ज्येष्ठ भजनी गायक गजाननबुवा म्हात्रे यांच्या गायनाने या गुरुपूजन सोहळ्यास सुरुवात झाली आणि तब्बल सहा तास हा कार्यक्रम शिष्यांच्या गायनाने रंगला. सुरुवातीला भजन भूषण गजानन बुवा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप्रज्वलन कर्जत नगरपरिषदेच्या नगरसेविका मधुरा चंदन, संचिता पाटील, माजी नगरसेवक संतोष पाटील तसेच गजाननबुवा पाटील यांच्या कन्या सचित वांजळे आणि गजानन बुवा म्हात्रे यांचे हस्ते झाले.
यावेळी भजन भूषण गुरु प्रसाद बुवा पाटील यांच्या शिष्यवर्गाने अनेक अभंग आणि भाजनामधून आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त केला. त्यावेळी चितार्या चित्रे काढी भिंतीवरी,गुरू परमात्मा परेशु,केला मातीचा पशुपती, हीच माझी व्हावी आस, माझा वडिलांची मिराशी, ज्ञानियांचा राजा गुरू महाराव, पापाची वासना नको दाऊ डोळा, ऐक यशोदे बाई तुझा हरीला सांग काही, अशी काही गाजलेलं अभंग सादर केले.
दत्त प्रासादिक भजन मंडळ आदई, प्रेमनाथबुवा पाटील (पनवेल),डी आर जाधव (ठाणे), काळुबुवा खडे (उकरूळ), कृष्णा राणे (कर्जत), यश पाटील, नील तुपे, मैत्रयी तुपे, प्रवीणबुवा थोरवे, किशोरबुवा बोराडे, विष्णुबुवा घरत, दशरथबुवा हजारे, एस.के. भोईर, विलासबुवा बोराडे यांना वादक म्हणून चेतन पाटील (पनवेल), आकाश काटे (नेरळ), ओंकार म्हात्रे, मनोज देशमुख, विशाल निगुडकर, रोहन पाटील, हृषीकेश बोराडे, प्रेम पाटील, वैष्णव पाटील, राजवर्धन देशमुख, सिद्धांत कोळी यांनी साथ दिली आणि आदरभाव व्यक्त केला.
गुरुपूजन सोहळ्याला पंकज पाटील, राजेश लाड, प्रकाश दांडेकर, प्रमोद सावंत, संभाजी थोरवे, मोहन पाटील, दत्तात्रय म्हसे, संतोष पाटील, गणपत दगडे, चिंतामण पाटील, भरत घुडे,अनंत पाटील, वैभव तुपे, गजानन गुरव, केशव तुपे, समीर देशमुख, श्रीराम पाटील, समाधान पाटील, जगन पाटील, सुशील आंबवणे यांनी भेट दिली. तर हा सोहळा यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीचे दिलीप आंबवणे,रवींद्र लाड, महेंद्र निगुडकर, मधुकर पवाळी, सुनील देशमुख, सुनील आंबवणे, सोपान थोरवे, सुरेश भरकले, समीर चव्हाण, जयवंत पाटील, निलराज विचारे, रोशन खोपकर, साईनाथ बोराडे यांनी नियोजन केले होते.