। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर डेरवली गावाजवळ ट्रेलरने मारुती सुझुकी अल्टो कारला पाठीमागून धडक दिली. यावेळी कार टेम्पोवर आदळल्याने या अपघातात एक जण जखमी झाला. याप्रकरणी ट्रेलर चालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोपोली येथील निखिल नंदकुमार गुरव हे व त्यांचा आतेभाऊ सौरभ राऊळ हे मारुती सुझुकी अल्टो कार घेऊन पनवेल येथे येत होते. डेरवली गावाजवळ आले असता पाठीमागून येणार्या ट्रेलरने त्यांच्या कारला पाठीमागून ठोकर मारली. यावेळी कार समोरुन चालणार्या टेम्पोवर आदळली.
ट्रेलर चालकाला याबाबत विचारले असता त्याने कारमधील सौरभ राऊळ याला धक्काबुक्की व शिवीगाळ केली. यात सौरभ जखमी झाला असून ट्रेलर चालक पळून गेला .