। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंदविश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय, ठाणे येथील विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत गेली अनेक वर्षे इकोफ्रेंडली गण्पती तयार करुन पर्यावरण हिताचा संदेश देतात. कोरोनाच्या काळात दोन वर्ष या प्रकल्पाला खंड पडला होता. परंतु पुन्हा एकदा यावर्षी विद्यार्थ्यांनी उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी टेराकोटा मातीपासून गणेशमूर्ती साकार करुन आनंद व दोन वर्षांची उणीव भरुन काढली व अगदी उत्साहात, जोशात गणेशमूर्ती साकारल्या.
आनंदविश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय इयत्ता 13 वी ते इयत्ता 15 वी च्या विद्यार्थ्यांना रिध्दी आर्ट स्टुडिओच्या रिध्दी शेळके यांनी गणेशमूर्ती कशी बनवायची, याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांकडून टेराकोटा या मातीच्या सुंदर, सुबक गणेशमूर्ती साकारुन घेतल्या. टेराकोटा ही माती पुरातनकाळापासून वापरली जाते. या मातीचा वापर भरपूर कामांसाठी केला जातो. ही माती सहज विरघळते. निसर्गाच्या दृष्टीने ही माती अजिबात हानीकारक नाही. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणुन पर्यावरणाचा संदेश या मार्फत देण्यासाठी हा उपक्रम पुन्हा सुरु करुन सगळयांनी बाप्पाला प्रार्थना केली. संस्थेच्या सदस्या व प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी देखील पर्यावरणास उपयुक्त अशा उपक्रमात सहभाग घेतला.