। अलिबाग । प्रतिनिधी ।
दुपारी 12च्या सुमारास अलिबाग बायपास रोडला एस.टी. बंद पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे. अलिबाग आगारात चौकशी केली असता समजले की ती एस.टी. मुंबई आगारातली असून अलिबाग वरून मुंबईकडे निघाली होती.
एस.टी. चालकास विचारले असता त्यांनी सांगितले की ब्रेकडाऊन मुळे एस.टी. बंद पडली आहे. तरी गाडी पूर्ववत चालू होण्यास दिड तास तरी लागेल सांगण्यात आले. तसेच गाडीतील प्रवाश्यांना मुंबईकडे जाणाऱ्या दुसऱ्या एस.टी.मध्ये पाठवण्यात आलेले आहे.
आता एस.टी. पूर्ववत चालू होई पर्यंत बायपास रोडला वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे.







