। नेरळ । वार्ताहर ।
माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटकांना प्रेक्षणीयस्थळी घेऊन जाण्यासाठी घोडे वापरले जातात. दस्तुरी नाका येथे रस्त्यालगत असलेल्या विजेच्या खांबाचा घोड्याला धक्का बसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि.28) घडली.
वेगवेगळ्या पॉईंट पाहण्यासाठी घोडेस्वारी घेऊन पर्यटक फिरण्याचा आनंद घेत असतात. 28 सप्टेंबर रोजी दस्तुरी येथे पॅनोरमा पॉईंट रस्त्यालगत आरव नावाचा परवाना क्रमांक- 23 घोडा चालक आपला घोडा रोजच्याप्रमाणे पर्यटकांना फिरण्यासाठी घेऊन जात होता. यावेळी रस्त्यालगत असणार्या विजेच्या खांब्याचा धक्का घोड्याला बसला आणि घोड्यांच्या पायात लोखंडी नाल असल्याने घोड्याला विजेच्या पोलाकडे खेचून घेतले. त्यावेळी घोड्यावर बसलेल्या घोडा चालकाने घोड्यावरून उडी मारून प्राण वाचवले असून घोड्याला मात्र तीव्र विजेचा शॉक लागल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून प्रशासनाच्या हलगर्जीपणावर अश्वमालक गणेश शिंगाडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
माथेरानमध्ये सुरक्षित वायरिंग नसल्याने शॉक लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.
संतोष शिंगाडे
अध्यक्ष मूलनिवासी अश्वपाल संघटना