| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्याचे नवे तहसीलदार म्हणून उत्तम दिनकर कुंभार यांनी पदभार स्वीकारला. उत्तम दिनकर कुंभार हे प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले तसेच अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असून यापूर्वी झोपड़पट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबई बांद्रा येथे सेवेत कार्यरत होते. उल्हासनगर येथे तहसीलदार म्हणून प्रभावीपणे काम पाहिले आहे. पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कुंभार यांनी कार्यालयाची सूत्रे हाती घेतली.
सुधागड तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आवश्यक ते योगदान देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लोकशिक्षणाची चळवळ गतिमान करण्याबरोबर आदिवासी विकास प्रकल्प,कामगार आयुक्त यांच्या सहकार्याने आदिवासी स्थलांतर रोखण्यासाठी लक्ष देणार असल्याचे यावेळी सांगितले. सुधागड तालुका आदिवासी बहुल तालुका असून कातकरी उथान अभियान तसेच, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सप्तसूत्रीची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार आहोत असे कुंभार यांनी स्पष्ट केले.