। पुणे । प्रतिनिधी ।
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गेल्या 48 तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्यांच प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन जाहीर करण्यात आले. त्यानुसार विक्रम गोखले सध्या ते व्हेंटिलेटरवर असनू, त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे.
तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत असून, आता ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे.